भावनिक ?

भावनांच्या आहारी जावून मनुष्य अनेक वेळेला चुकीचे निर्णय घेतो व आयुष्य भर पश्चाताप करतो व ह्या पश्चातापातून मुक्तता आम्ही देतो.योगा ?

शरीराची योग्य प्रकारे निगराणी न केल्यामुळे येणा-या शारीरिक व मानसिक व्याधी व त्यातून होणारे असंतुलन त्यावर आम्ही योगाद्वारे संतुलन व शरीरावर आपले नियंत्रण प्रस्थापित करतो.बायो फीडबेक थेरपी ?

भूतकाळातील घटना सारख्या आठवून दु:खी होणे व त्यातून मार्ग न मिळणे, पण मार्ग आम्ही दाखवतो व यशस्वी वाटचाल करण्यास आत्मबल देतो.राजकिय ?

राजकिय क्षेत्रामध्ये एकमेकांवरील शाब्दीक चिखलफेंकी मुळे प्रचंड प्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो व अशावेळेस अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण मिळते व्यक्ती व्यसनाधीन होतात व त्यांचे परिणाम राजकिय कारकीर्दीवर होतात असे होवू नये त्यासाठी आम्ही योग्य मार्गदर्शन करतो.सामाजिक ?

मनुष्य समाजप्रियेप्राणी आहेव समाजातील होणा – या घडामोडीचा त्याच्या मन बुद्धी व शरीरावर परिणाम होत असतो व त्यातून त्याच्या मनात सामाजिक भीती, आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते व न्यूनगंड तयार होतो आम्ही त्यावर निश्चित असे मार्गदर्शन करतो.बेलीफ एन्ड बेलीफ एन्ड आयडेन्टीटी ?

तुम्ही स्वत: विश्वासू आहात का? इतर व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता का? ह्यातुन निर्माण होणा-या शंका-कुशंका भानावलेली परिस्तिथी ह्यावर आम्ही तुमची ओळख निर्माण करण्यात हातभार लावतो.करिअर ?

कोणते करिअर निवडावेअसा मनात गोंधळ निर्माण होतो, योग्य व आवडीचे क्षेत्र कोणते? नावडीचे क्षेत्र कोणते? स्वत:ची योग्य आवड-निवड काय? पालकांचा दबाव ह्यामुळे आयुष्य बरबाद होते, व मनाविरुद्ध करिअर मिळते असे होवू नये ह्यासाठी योग्य सल्ला आम्ही देतो.प्रीमेरीटल: (विवाह पूर्व) ?

अनेक व्यक्तींच्या जीवनात विवाह पूर्व साथीदार निवडतांना मनात गोंधळ निर्माण होतो, व मागील आयुष्यात एखाधा व्यक्तीचा प्रभाव कायम राहतो, व ती व्यक्ती आपले वैवाहिक जीवन योग्ये प्रकारे निभावू शकणार नाही अशा शंकेने भीतीने ग्रासते तेव्हा भीती वर मात करण्याची शक्ती आम्ही देतो.वैवाहिक ?

वैवाहिक जीवन मध्येक्षणाक्षणाला ताणताणाव निर्माण होतात कोणीही कोणाला नमती बाजू घेवून समजुन घेण्याच्या तयारीत नसतो, प्रत्येकामध्ये अहंकार रूपी “मी” लपलेला असतो व क्षणाक्षणाला “मी” जागृत होतो, त्यामुळे वैवाहिक जीवन क्लेषकारक होते, पती-पत्नी मध्ये दुरावा निर्माण होवून प्रचंड एकटेपणा येतो व त्यातून घटस्पोटा पर्यंत जाण्याचे टोकाचे पाउल उचलले जाते अशा वेळेस पती-पत्नीतील निर्माण झलेली दरी, गैरसमज दूर करतो व प्रेम निर्माण करतो.ट्रौमा: ( मानसिक आघात) ?

अचानक खूप मोठा धक्का देणारी किंवा दु:खद अशी स्थिती निर्माण करणारी घटना, मानसिक आघात अशी स्थिती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा व्यक्तीचा तोल जातो पण आम्ही तो तोल सावरतो.ग्रिफ एंड लॉंस: (दु:ख आणी नुकसान) ?

दु:खी व्यक्ती कोणतेच कार्य व्यवस्थित करत नाही व सतत आपल्या दु:खाला कुरवाळते जसे प्रिय व्यक्तीचा मृत्यू, व्यापारात आलेले नुकसान व ह्यातून स्वत:ला सावरता न आलेली व्यक्ती आत्मघात करून घेते किंवा दु:खी होते, असे होवू नये म्हणून आम्ही पप्रयत्न करतो.डिप्रेशन: (मोठ्या प्रमाणात येणारा ताण) ?

सतत येणा-या ताणांचा परिणाम फार वाईट होतो. जेसे घटस्फोट, मोठा आजार, प्रेमभंग, जिवलग व्यक्तीचा मृत्यू किंवा सतत मना विरुद्ध घडणा-या घटना, त्याचा परिणाम माणसाला जीवनातुन उठवतो व आम्ही त्याचे जीवन सुखी समृद्ध व तणाव विरहीत करतो.स्ट्रेस: (ताण-तणाव) ?

आयुष्यात अनेक प्रकारचे ताण-तणाव आहे. निश्चित सांगता येणार नाही, पण छोट्या-छोट्या गोष्ठी मधून आलेल्या तानावामधून योग्य मार्गदर्शन देवून आम्ही अनेकांचे जीवन सुंदर केले आहे,करत आहोत व करत राहू.कौटुंबिक ?

आप्तस्वकीये कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये सतत काहीना काही कारणामुळे वाद होत असतात व त्याचे रूपांतर अनेक वेळा हानिकारक होते, असे होउ नये कुटुंबात एकोपा, मानसाम्मान, प्रेम आपुलकीची भावना, समर्पण, त्याग, ह्या गुणांची वाढ आम्ही समुपदेशन केंद्राद्वारे करतो व विभक्त होणा- या कुटुंबाला एकत्र आणण्याचे कार्य करतो.आरोग्य सेवा

 • योगा
 • मेडिटेशन (मनशांती)
 • ऑक्युप्रेशर
 • प्राणायम
 • संपूर्ण बॉडी मालीश
 • पाठदुखी, संधीवात, बरसायटीस, फ्रोझन शोल्डर
 • मणक्याचा आजार
 • अंगदुखी
 • पायदुखी
 • हात पायात मुंग्या
 • डोकेदुखी
 • केसांच्या समस्या
 • पारालीसीस
 • टेनिस एल्बो व कंबरदुखी, सर्व समस्यांवर घरपोच सेवा..

शारीरिक तपासणी आणी विश्लेषण

 • कुटुंबातील व्यक्ती, मित्र परिवाराला सोबत घेऊन या.
 • आरोग्य सुधारा / वजन कमी करा / वाढवा.
 • वजन नियंत्रित ठेवा / सदैव उत्साही राहा.

 • उंचीप्रमाणे आपले वजन किती असावे...?
 • रोज किती पाणी पिले पाहिजे / किती वेळ व्यायाम ?
 • त्वचेखालील / अवयवांवरील चरबी किती असावी
 • स्नायुशक्ती / शरीराचे वय इ.

लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ या सार्वांसाठी खास उपाय व मार्गदर्शन आरोग्यम धनसंपदा....नर्सिंग केअर सेंटर

 • आमच्याकडे वृद्धांसाठी रोज व्यायाम्ची सोय उपलब्ध आहे.
 • सुसज्य अशा वातावरणात वृद्धांसाठी रोज व्यायाम, योगा, मालिश, तसेच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सांभळण्यासाठी नार्सिंग स्टाफ व सकाळी दूध, फळे, अल्पोआहार तसेच दोन वेळी जेवण.
 • तसेच आजारी व्यक्ती करीता घरपोच नर्सिंग स्टाफ, मावशी, आया, ब्रदर, वार्ड बॉय, डॉक्टर, फ़िजिओथेरपीस्ठ, ऑक्युप्रेशररिस्ट मिळेल.
 • मायग्रेन (अर्धी डोकेदुखी), मानदुखी, संधीवात, बरसायटीस, फ्रोझन शोल्डर, पारालीसीस पाठदुखी, टेनिस एल्बो, कंबरदुखी (स्लीप डिस्क) सायटिका, गुडघेदुखी, हात पायात मुंग्या, टाच दुखी घरपोच सेवा मिळेल.